आई एक प्रेम

✍️ अनिल रुषी तुलकाने आई तू नाव माय, त्यातच आले पुरे गाव, तुझ्या विना या जगात, न उरे कोणा ठाव। प्रेम म्हणजे आई, आणि आई म्हणजे प्रेम, तुझ्या मायेच्या सावलीत, आम्ही सदा राहू क्षेम। तुझ्या कुशीत स्वर्ग आहे, तुझ्या शब्दांत गोडवा, तुझ्या डोळ्यांत दिसे आम्हा, देवाचा खरा ठेवा। तू उपाशी राहून आम्हा, घास भरवितेस प्रेमाने, तुझ्या त्यागाच्या ऋणातून, मुक्त न होऊ जन्माने। तुझ्या हातचा तो स्पर्श, सारे दुःख हरवून जातो, आई तुझ्या एका हाकेत, जीव पुन्हा फुलून येतो। देव कुठे शोधू आम्ही, तुझ्यातच तो दिसतो, आई तुझ्या चरणीच माझा, सारा संसार विसावतो…॥ 💖

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुंदरता का पैमाना

संघर्ष का स्वरूप

घर की परी