सौंदर्यांची चे दोन पैलू
या जगात 'विश्व सुंदरी' हा किताब जितका प्रसिद्ध आहे, तितकी चर्चा 'विश्व सुंदरा'ची का होत नाही? यामागे निसर्गाचा एक मोठा तर्क दडलेला आहे. १. स्त्री: सौंदर्याची खाण आणि कोमलता निसर्गाने स्त्रीला घडवताना त्यात नजाकत आणि कोमलता भरली आहे. तिचे सौंदर्य चंद्राच्या शीतलतेसारखे असते. २. पुरुष: एक अभेद्य पर्वत पुरुष सौंदर्यापेक्षा त्याच्या भव्यतेसाठी आणि कणखरपणासाठी ओळखला जातो. पुरुष म्हणजे एक पर्वत कठोर विशेष कविता: सौंदर्याचे दोन पैलू ✍️ अनिल रूषी तुलकाने निसर्गाच्या लेखणीचे दोन वेगळे रंग, एक कोमल चांदणं, तर एक वादळाचा संग। स्त्री म्हणजे नाजूक फुलांची हळवी नजाकत, पुरुष म्हणजे शांत धैर्याची अथांग ताकद। तिच्या रूपात दडलेली विश्वाची मोहकता, त्याच्या श्रमात सापडते जीवनाची सार्थकता। ती भावनांनी रंगवते प्रत्येक क्षण, तो स्वप्नांना देतो भक्कम पायाभरण। म्हणूनच नाही कुणी श्रेष्ठ, नाही कुणी कमी, दोघांच्या संगतीतच पूर्ण होते ही सृष्टी थामी। ती “सुंदरी” म्हणून ओळखली जाते, तो “शौर्य” म्हणून मानला जातो, पण खरं सांगायचं तर ‘अनिल’, दोघांमुळेच जीवन फुलत जातो।